गुंडीचा (किंवा गुंडिचा) या इन्द्रद्युम्नाच्या राणी होत्या आणि त्यांनी वासुदेवांच्या आज्ञेने मंदिर बांधले असे मानले जाते. पुरीच्या देवतांच्या कथेत राणी गुंडीचाचे विशेष स्थान आहे.
इन्द्रद्युम्नाने, भगवान वासुदेवांच्या सूचनेनुसार, पुरीच्या समुद्रात दारु (लाकडी ओंडका) पाहिला. त्या दारूपासून देवतांच्या मूर्ती तयार करायच्या होत्या, पण कोणताही सुतार ते करू शकत नव्हता. विश्वकर्मा यांनी २१ दिवसांत मूर्ती तयार करण्याचे वचन दिले, पण अट होती की त्यात कुणीही व्यत्यय आणू नये.
पंधराव्या दिवशी, राणी गुंडीचा अस्वस्थ झाल्या, कारण मूर्ती बनवण्याच्या खोलीतून काहीच आवाज येत नव्हता. त्यांच्या आग्रहाखातर, इन्द्रद्युम्नाने दरवाजा तोडला. त्यामुळे वचनभंग झाला आणि विश्वकर्मा अदृश्य झाले, अर्धवट बनलेल्या मूर्ती मागे राहिल्या — त्यांना पाय नव्हते, कान नव्हते, आणि हाताच्या जागी केवळ ठोकळे होते.
वासुदेव स्वतः प्रकट झाले आणि इन्द्रद्युम्नाला सांगितले की त्यंच्या अशाच रूपाची पूजा करावी.
त्यानंतर, इन्द्रद्युम्नाने गुंडीचा मंदिर बांधले, जिथे देवता एका आठवड्यासाठी राहतात. यामुळे राणीला देवांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.
गुंडीचा मंदिर हे जगन्नाथ मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. वर्षाच्या उर्वरित काळात हे मंदिर रिकामे असते.
हे चित्र सुदर्शन पटनायक यांच्या वालुकाशिल्पाचे आहे, जे गुंडीचा मंदिरासमोरील रथांचे दृश्य दाखवते
चिंतामणी आचार्य, पुरी, १९४९