1

परमवीरचक्र प्रश्नमंजूषा

वीर योद्धे युद्ध जिंकतात. पहिला बार उडेपर्यंतच युद्धाचे नियोजन समोर असते. कारगिल युद्ध हे अश्या भीषण परिस्थितीतील शौर्याचे उदाहरण आहे. आज कारगिल दिनाच्या निमित्ताने परमवीरचक्र विजेत्या भारतीय वीरांच्या कथा आपण वाचूया. सेनादलातील भारतीय शौर्य पुरस्कारांपैकी हा सर्वोच्च सन्मान आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत केवळ 21 वीर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यापैकी 14 वीरांचा हा मरणोत्तर गौरव ठरला.
पहिल्या परमवीरचक्र पुरस्काराचे मानकरी कोण होते? सर्वात लहान मानकरी कोण? हवेत असताना कोणाचा मृत्यू झाला? कोण विनाकारण बळी गेले आणि कोणी अन्य भूमीसाठी आपले प्राण वेचले? अश्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या 12 प्रश्न असलेल्या प्रश्नमंजूषेतून !
ही प्रश्नमंजूषा इयान कार्डोझो यांच्या ‘परमवीर, अवर हिरोज इन बॅटल’ या पुस्तकाच्या आधारे रचली आहे.

1947 च्या काश्मीर युद्धात शत्रूला परतवून लावण्यासाठी मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिले परम वीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यांनी कोणते महत्त्वाचे ठिकाण वाचवले होते?

कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एका घोषणेने लोकांची मने जिंकली. एका महत्त्वाच्या टेकडीवरील शत्रूचा पराभव केल्यानंतर काही दिवसांतच ते दुसऱ्या लढाईत शहीद झाले. त्यांनी म्हटलेले ते लोकप्रिय घोषवाक्य काय होते?

ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील संगम साहित्यात शूरांचे स्मारक असलेल्या वीरशिलांचा उल्लेख आहे. या स्मारकांना काय म्हणतात?

१९४७ साली झालेल्या पहिल्या भारत- पाकिस्तान युद्धात लढलेल्या पाच वीरांना परमवीरचक्र लगेचच प्रदान करता आले नव्हते. ते नंतर देण्यात आले. या पुरस्काराची घोषणा केव्हा करण्यात आली?

परम वीर चक्राचा स्विस संबंध आहे. तो कसा?

ऋग्वेद काळातील एका अस्त्राचे चित्र परमवीरचक्रावर कोरलेले आहे. त्या अस्त्राचे नाव काय आहे?

निर्मल जित सिंग सेखों यांना परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. त्यांचे शौर्यप्रदर्शन कुठे घडले?

ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना कारगिल युद्धात परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. त्यांनी ज्या भागात लढा दिला तो म्हणजे कारगिल युद्ध असे मानले जाते. तो भाग कोणता आहे?

5 डिसेंबर 1961 रोजी कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांना एका आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी पराक्रम गाजवल्याबद्दल परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. ती संस्था कोणती होती?

ऑपरेशन मेघदूत ही एका यशस्वी, शांत पण अजूनही सुरू असलेल्या संघर्षाची सुरुवात होती. या युद्धात सहभागी नायब सुभेदार बाणासिंग यांना परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. ही रणभूमी कुठे आहे?

हा परमवीरचक्र विजेता दुसऱ्या देशात लढला आणि शहीद झाला. त्याने ही लढाई कुठे लढली?

मेजर शैतान सिंग यांनी एका दूरवरच्या पोस्टचा शेवटपर्यंत शौर्याने बचाव केला. त्या एकाच लढाईत 114 भारतीय सैनिक शहीद झाले. ही लढाई कुठे लढली गेली?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In