366

पुराणांमध्ये स्त्रिया प्रश्नमंजुषा

पुराणांमध्ये तत्कालीन हिंदू संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. पुराणे गोष्टींच्या माध्यमातून नीतिमत्ता आणि तत्त्वज्ञान यांचे धडे देतात. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर यातील काही गोष्टींचा आपण आढावा घेऊ. या प्रश्नमंजुषेसाठी डॉ. शारदा आर्य यांच्या Women In Puranas या पुस्तकाचा मुख्य आधार घेतला आहे.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा !!

पुराणांमध्ये “देवांची आई” असे कोणाला संबोधले आहे?

हिंदू विवाहसोहळ्यांमध्ये आनंदाचे प्रतीक म्हणून कोणत्या महिलेला तारा म्हणून संबोधले आहे?

हरिश्चंद्र व तारामती हे कोणत्या सद्गुणाचे प्रतिनिधिक आहेत?

चित्रलेखाने कृष्णाच्या नातवाचे तिच्या सर्वात जिवलग मैत्रीणीसाठी अपहरण केले. नातवाचे नाव सांगा.

द्रौपदीप्रमाणेच, नलाच्या पत्नीलाही त्याच्या जुगारामुळे त्रास सहन करावा लागला. नलची पत्नी कोण होती?

पुराणातील दोन प्रमुख राजवंशांमधील चंद्रवंशी राजवंशाची सुरुवात कोणत्या उभयलिंगी देवतेने केली

इंद्रदेवाची मुलगी जयंतीने तिच्या वडिलांची अवज्ञा करून असूरांच्या गुरुशी लग्न केले.ते गुरु कोण होते?

मथुरेची राणी पद्मावती हिला एका मायावी राक्षसाने फसविले आणि त्यातूनच पुराणातील एक बलाढ्य खलनायक तिच्या पोटी जन्मास आला. खलनायकाचे नाव सांगा.

कृष्णासोबत पळून जाऊन त्याची प्रमुख राणी कोण बनली?

वट पौर्णिमेला, हिंदू स्त्रिया त्यांच्या पतींच्या कल्याणासाठी वडाच्या झाडाभोवती धागा बांधतात. हा सण कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो?

सुमन ही तिच्या पतीची गुरु झाली होती.
तिने त्याला काय शिकवले?

कपिल मुनींची आई देवाहुती ही अभ्यासू वृत्तीची बुद्धिमान स्त्री होती. तिला कपिल मुनींनी सर्वात पुरातन हिंदू तत्वज्ञान शिकविले.ही कोणती प्रणाली आहे?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In