413

भारताचा राजा

सर्व देवतांमधील,गणपती हा लोकांचा अधिक प्रिय देव आहे।विशेषतः महाराष्ट्रात तो अधिक आदरणीय आहे।भाद्रपद विनायक चतुर्थीला मुंबईकर आपापल्या विभागात गणपती मूर्ती ची स्थापना करतात। आपापल्या विभागाचा तो राजा म्हटला जातो।उदाहरणार्थ अंधेरी चा राजा। परंतू गणपतीचे भारतात सर्वत्र आवडीने पूजन करतात। त्रिवेन्द्रम, सिक्किम, मुंबई, त्रिपुरा किंवा माउंट आबू, सर्वत्र गणपती पूजला जातो।तो खरोखर “भारताचा,राजा”आहे। भारतात सर्वत्र गणेशाचे कसे पूजन होते,त्या सबंधित १२ प्रश्र्नांची ही प्रश्रनोत्तरी,सोडविण्याचा अवश्य प्रयत्न करा। “गणपती बाप्पा मोरया” जयघोषाची सुरवात कशी झाली? जैन गणपती ची पूजा कशा रीतीने करतात? दुसर्‍या महत्वाच्या सण-उत्सवांचा गणपती घटक कसा झाला? कोणत्या पुराणकथेने गणपतीला उपनिषदां बरोबर जोडले आहे? ५ भाग्यवान स्पर्धकांना गणेशाचे अप्रतिम चित्र असलेले पुस्तक “शुभ गणेश,मंगल सुरवात “,भेट मिळेल।
छायाचित्र गणपती विसर्जनाचे आहे।याचे श्रेय पुरस्कार विजेता छायाचित्रकार सलोनी जैन यांना आहे।

सन १८९२ मध्ये,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी ज्या शहरात पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले, त्या शहराचे नाव काय?

गणपती बाप्पा मोरया हा लोकप्रिय जयघोष आहे. यातील मोरया शब्दाचा मुलतः संदर्भ कोणाशी जोडलेला आहे?

गणेशोत्सवा व्यतिरिक्त,दुसर्‍या सार्वजनिक पूजा उत्सवामधे गणेशाची अनेक दिवस पूजा करतात.तो सण कोणता?

मुंबईमधील ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहे. “नवसाचा गणपती”म्हणून त्याला फार मान आहे.नवसाचा’ या शब्दाचा अर्थ काय?

लोकप्रिय आरती ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ चा कवी, शिवाजी महाराजांचे देखील प्रेरणास्थान होते,तो कोण आहे?

मुद्गगल पुराणामधील गणपतीच्या विविध अवतारांचा, एक धार्मिक विचार समजावून सांगण्यासाठी उपयोग करण्यात आला आहे,
तो विचार कोणता?

खैरताबाद गणेशोत्सवातील गणपतीची मूर्ती अन्य अनेक उंच मूर्तीं पैकी एक आहे.पण त्या गणेशोत्सवात सुरुवात १ फूट मुर्ती पासून केली होती.हा उत्सव कुठे साजरा होतो?

प्रसिद्ध “वक्रतुंड महाकाय” श्लोकाचा रचनाकार कोण आहे?

जैन सुध्दा गणेश पूजन करतात. गणपतीच्या कोणत्या विशिष्ट गुणांसाठी जैनांमध्ये त्याला(गणपतीला) मानले जाते?

बहुतांशी दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची सुरुवात गणेश स्तुतीने करतात, ते स्तवन कोणते?

विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रा’ ची सुरुवात सर्व अडचणी हरण करणाऱ्या ईश्वराचे आवाहन करून होते. काही जणांच्या मते ते गणेशाला आवाहन आहे. आपल्याला हे स्तोत्र प्रथमतः कुठे बघावयास मिळते?

पुरीचे भगवान जगन्नाथ, एका प्रसिध्द उत्सवापूर्वी गणेशरूपात (हाथी बेशा) असतात,तो उत्सव कोणता?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In