बौद्ध परंपरेनुसार, बलीने स्वतःची जीवनकथा अवलोकितेश्वराला सांगितली.
त्याने स्वतःचे वर्णन अहंकारी आणि गर्विष्ठ राजा म्हणून केले.
त्याने असंख्य राजे आणि ब्राह्मणांना यज्ञासाठी आमंत्रित केले होते.
सर्व जण त्याच्या समोर जमलेले पाहून त्याला गर्व झाला की तोच त्यांचा स्वामी आहे.
तो त्यांच्या स्त्रियांशी क्रूर वागला, मुला-मुलींना ठार मारले, क्षत्रियांना, पांडवांना आणि कौरवांना कैद केले.
यानंतर त्याने नारायणाचा शोध घेतला पण तो सापडला नाही. मग त्याने यज्ञास सुरुवात केली.
त्या काळात नारायण दशरथपुत्र (राम) म्हणून प्रकट झाले आणि त्यांनी पांडव-कौरवांना मुक्त केले.
नंतर दशरथपुत्र बुटक्या रूपात (वामन) यज्ञस्थळी आला आणि दोन पावलांची भूमी मागितली.
बलीने त्याला तीन पावले देऊ केली. पण जेव्हा बली तिसरे पाऊल देऊ शकला नाही, तेव्हा दशरथपुत्राने त्याला यज्ञभूमीतून हाकलून दिले आणि पाताळात पाठविले.
यानंतर पांडव, कौरव आणि क्षत्रियांनी बळीची सर्व संपत्ती घेतली.
ही कथा बलीने अवलोकितेश्वराला सांगितले आणि तो म्हणाला की त्याने दुर्दैवी दान केले ज्यामुळे तो बंधनात सापडला.
तेव्हा अवलोकितेश्वरांनी त्याला धर्म शिकवला आणि सांगितले की तो असुरांचा न्यायी राजा बनेल.
तसेच तो पुढे तथागत, म्हणजेच पूर्ण प्रबोधन आणि ज्ञान प्राप्त करणारा अरहंत होईल.
अशा रीतीने बौद्ध परंपरेत बौद्ध धर्म, वामन अवतार, रामायण आणि महाभारत यांचे संगम दिसून येतो.
स्रोत: Wisdom-lib, कारण्डव्यूह सूत्र.
Picture Credit: Vrindavan Das