238

नरकासुरावरील कृष्णविजय प्रश्नमंजुषा

दिवाळी हा विविध प्रकारे साजरा केला जाणारा बहुरंगी सण आहे.राम, कृष्ण,लक्ष्मी व काली ह्या सर्वांचा दिवाळीच्या सणाशी काही ना काही प्रकारे संबंध आहे. ह्या सर्वात, कृष्णाचा नरकासुरावरील विजय हा आपण नरकचतुर्दशीच्या रुपात पश्चिम व दक्षिण भारतात त्या दिवशी साजरा केला जातो.श्री कृष्णाने नरकासुरावर विजय कधी प्राप्त केला,नरकासुराचे पालक कोण होते, त्याला कुठल्या स्त्रीच्या हातून मृत्यू आला?त्याचे राज्य कुठे होते?
आपली पुराणे व आपली महाकाव्ये अनेक गोष्टी आपल्याला कथन करतात.त्यातील एक कथा नरकासुराची!ह्या प्रश्नमंजुषेत आपण ह्या कथांचा अनुभव घेऊया.

सोबत, gatha.com ह्या संकेतस्थळावर असलेले अत्यन्त वैशिष्ट्यपूर्ण असे कातड्यावरील चित्र आहे.प्रश्नमंजुषा सोडवणाऱ्या पाच भाग्यवान स्पर्धकांना ‘Ramayana unravelled’ हे अमी गणात्रा लिखित पुस्तक भेटरूपात प्राप्त होणार आहे.
चला तर ,ह्या ज्ञानरुपी फराळाचा ह्या दिवाळीत आस्वाद घेऊया!

शुभ दीपावली!💐💐💐

नरकासुर एका विख्यात मातापितांचा पुत्र होता.कोण होते ते?

प्राग् जोतिषपूर येथे नरकासुर राज्य करत होता. आताचे कुठले राज्य म्हणजे तेव्हाचे प्राग् जोतिषपूर?

जेव्हा नरकासुराने इंद्राच्या आईची कर्णभूषणे पळवली तेव्हा
इंद्राने कृष्णाची मदत घेतली.कोण होती इंद्राची आई?

गरूडाने श्रीकृष्ण व नरकासुराबरोबरच्या युद्धात काय भूमिका बजावली?

काही प्रसिद्ध कथांमध्ये एका स्त्रीने नरकासुराचा संहार केला. कोण होती ती?

कृष्णाचे एक नाव नरकासुराच्या पाच मुखी अधिकारी मारण्यावरून लाभले आहे. काय नाव आहे ते?

नरकासुराचा पराभव केल्यावर श्री कृष्णाने किती स्त्रियांना त्याच्या तुरुंगवासापासून मुक्त केले?

नरकासुराचा उल्लेख रामायणातही आढळतो. तेथे त्याचा संहार कुणी केला?

कल्की पुराणानुसार, विष्णू देवांनी नरकासुराला कुठल्या देवीची आराधना करण्यास सांगितले होते?

महाभारत युद्धामधील कुठला महान कौरव योद्धा नरकासुराचा पुत्र होता?

दक्षिण भारतात दिवाळीतील कोणती प्रथा नरकासुराचा संहार झाल्यानन्तर सत्यभामा व कृष्ण ह्यांनी कसा क्षीण घालवला,त्या पध्दतीचे अनुसरण करते?

कुठल्या राज्यात दिवाळीमध्ये नरकासुराची प्रतिमा दहन करण्याची प्रथा आहे?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In