183

महाकवी कालिदास प्रश्नमंजुषा

महर्षी वाल्मिकी, महर्षी व्यास आणि महाकवी कालिदास यांचे साहित्य हे संस्कृत साहित्यक्षेत्रातील सर्वोत्तम आहे. कालिदास हा एक श्रेष्ठ लेखक म्हणून मान्यता पावलेला आहे. श्री. ऑरोबिंदो यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की पंचेंद्रियांना सुखविणारे काव्य आणि सौंदर्यात्मकता तसेच कामुक भावना या सर्वांचा सुंदर संगम करणारा सर्वोत्कृष्ट कवि म्हणजे कालिदास. सौंदर्य हा त्याच्या लिखाणाचा आत्मा होता. जरी बरेचसे साहित्य हे कालिदासाचे म्हणून ओळखले जात असले तरी अभ्यासकांच्या मते कालिदासाने सात पुस्तके‌‍ नक्की लिहिली – चार काव्ये आणि तीन नाटके.

कालिदासाच्या जयंतीनिमित्त या प्रश्नमंजुषेत त्याच्या रचनांचा आणि आयुष्याचा आपण मागोवा घेऊ.

ऋतुसंहार हे कालिदासाचे ऋतुंवरील भाष्य आहे. ह्यात किती ऋतुंचे वर्णन केले आहे?

कुमारसंभवमधे कोणत्या युद्धदेवतेच्या जन्माचे वर्णन आहे?

मेघदूत’मधे प्रियकराचा प्रेयसीसाठीचा संदेश कोण घेऊन जातो?

रघुवंश या काव्यात कोणत्या राजवंशाचे वर्णन आहे?

मालविकाग्नीमित्रम् मधे अशा एका राजघराण्याचे वर्णन आहे ज्यांनी भारताच्या इतिहासातील पहिला सैन्यपुरस्कृत सत्तापालट घडवला. हे राजघराणे कोणते?

कालिदासाचे कोणते नाटक हे भारतात कोणत्याही काळात निर्माण झालेल्या ज्ञात साहित्यामध्ये सर्वोत्कृष्ट समजले जाते?

विक्रमोर्वशीयम् या नाटकाद्वारे कालिदासाने आपल्या आश्रयदात्याला मानवंदना दिली आहे असे मानले जाते. या नाटकात कोणत्या अप्सरेचे पात्र आहे?

कालिदास कोणत्या राजाच्या दरबारात होता?

गढकालिका शक्तीपीठाचा कृपाप्रसाद मिळाल्यामुळे मूर्ख/ मूढ असलेला कालिदास ज्ञानवंत झाला. हे शक्तिपीठ कुठे आहे?

कालिदासाने मेघदूत बहुधा अशा ठिकाणी लिहिले जिथे श्रीरामाने वनवासात असताना भेट दिली होती. हे ठिकाण महाराष्ट्रात कुठे आहे?

अभिज्ञान शाकुंतलम् च्या दुसऱ्या भागात शकुंतला व दुष्यंत या दोघांनीही घेतलेले प्रायश्चित्त ही एक अद्वितीय भारतीय संकल्पना आहे असे टागोर यांनी म्हटले आहे. ही संकल्पना कोणती?

“उपमा कालिदासस्य” असे म्हटले जाते. कालिदास हा कोणत्या काव्यालंकाराचा राजा समजला जातो?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In