440

विद्यार्थांसाठी गीता

आज गीता जयंती! हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवद् गीता हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे. काही विद्वान असंही मानतात की गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं तत्वज्ञान हे जगातील सर्वोत्कृष्ट आणि सुंदर तत्वज्ञान आहे. आजची प्रश्नावली ही गीतेतील काही विशिष्ट श्लोकांवर आधारित आहे.

गीता हा अथांग सागर आहे आणि आम्ही नवखे आहोत. त्यामुळे काही चुका राहिल्या किंवा गीतेतील गहनता आम्ही प्रश्नावलीत उतरवू शकलो नाही तर क्षमा असावी.

आजच्या प्रश्नावलीसाठी प्रमुख स्त्रोत आहेत-
* श्री. राजाजी यांचे भगवद् गीता: हॅण्डबुक फाॅर स्टुडन्ट्स
* श्री. बिबेक देबोराॅय यांचे गीतेचे भाषांतर

श्लोकांचे screenshots आणि transliterations खालील लिंकवरून घेतले आहेत.

https://www.holy-bhagavad-gita.org/

1. कृष्णाने अर्जुनाला एक अत्यंत मूलभूत संकल्पना सांगितली जिच्यामुळे तो त्याच्या वैचारिक ग्लानीच्या दयनीय अवस्थेतून बाहेर आला. ती संकल्पना कोणती?

2. कृष्णाने शिकवलेली आणखी अक महत्वपूर्ण मूलभूत संकल्पना म्हणजे कर्म. ही संकल्पना कोणत्या शब्दात विशद करता येईल?

3. गीता आपल्याला कशाचा त्याग करायला शिकविते?

4. अर्जुन कृष्णाला विचारतो, मनुष्य इच्छा नसतानाही पाप करायला का उद्युक्त होतो? कृष्णाचे उत्तर काय आहे?

5. कृष्ण मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणते उपाय सांगतो?

6. काहीही वाईट दृष्टिपथात आले तरी मन शांत रहावे म्हणून कृष्ण माणसांचे वर्णन कसे करतो?

7. मनुष्यप्राण्यांच्या श्रद्धा आणि उपासना पद्धती विविध प्रकारच्या असतात, हे गीतेमध्ये अधोरेखित केले आहे. वेगळ्या धर्माच्या लोकांना कृष्ण कशाप्रकारे मदत करतो?

8. या श्लोकाद्वारे कृष्ण कोणती वृत्ती अंगी बाणवण्यास सांगतो?
“तुम्ही मनाने माझ्यात विलीन व्हा, मला समर्पित व्हा, माझी उपासना करा, माझ्यासमोर नतमस्तक व्हा. मी तुम्हाला वचन देतो की शा प्रकारे तुम्ही मला प्राप्त कराल कारण तम्ही मला अतिप्रिय आहात.”

9. गीतेत सांगितल्याप्रमाणे खरे ‘ज्ञान’ कोणते?

कृष्णाने अर्जुनाला दाखविलेल्या वीश्वरूपाचा अध्यात्मिक अर्थ काय आहे?

11. हिंदू धर्माच्या आणखी कोणत्या ग्रंथात गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग सिद्धांत संक्षेपाने सांगितला आहे?

12. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत आणि बहुधा हिंदू धर्माशी निगडीत सगळ्यात लोकप्रिय आणि सर्वश्रुत ग्रंथ आहे. गीता कोणत्या शैलीमध्ये सांगितली आहे असे म्हणता येईल?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In