670

शिवजयंती निमित्त प्रश्नमंजुषा

आज १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगलांवर मात करून अटकेपासून कटकपर्यंत पसरलेल्या मराठा साम्राज्याची स्थापना केली. स्वामी विवेकानंद त्यांच्याबद्दल म्हणतात – “शिवाजी महाराज हे एक थोर राष्ट्ररक्षक होते; त्यानी आपल्या धर्म व समाजाला संपूर्ण विनाशाच्या धोक्यातून मुक्त केले.” त्यांची दूरदृष्टी, शौर्य आणि कार्यप्रणाली प्रगत आणि अतुलनीय होती. कित्येक शतकांनंतरही त्यांचा वारसा अनेक प्रकारे, आपल्या संस्कृतीतून, विविध प्रतिकांमधून, गड-किल्ल्यांमधून तसेच आपल्या स्वातंत्र्यात जिवंत आहे. या प्रश्नमंजुषेतील ५ भाग्यवान स्पर्धकांना डॉ. उदय कुलकर्णी यांचे “द मराठा सेंच्युरी” हे पुस्तक भेट दिले जाईल.

१. एकविसाव्या शतकात स्थलांतरासाठी आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राबाहेरच्या एका शहरात शिवाजी महाराजांचे बालपण गेले. ते शहर कोणते?

२. शिवाजी महाराजांच्या शिक्क्यातील (राजमुद्रा) घटकांचा समावेश करुन भारत सरकारच्या कोणत्या संस्थेचे चिन्ह अलीकडेच बदलण्यात आले आहे?

३. सुप्रसिद्ध मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट ही शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या कोणत्या ताकदीवर निर्माण केलेली आहे?

४. मुंबईतील प्रसिद्ध व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट या महाविद्यालयचे नाव काही वर्षांपूर्वी बदलण्यात आले होते. VJTI हे संक्षिप्त रूप कायम ठेऊन कुशलतेने केलेल्या ह्या बदलात V आणि J ही अक्षरे आता काय दर्शवतात?

५. शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून महाराष्ट्र राज्याच्या लक्झरी बस सेवेचे नाव ‘शिवनेरी’ ठेवण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या जीवनातील कोणती घटना घडली?

६. विजापूरच्या पराक्रमी परंतु कावेबाज सरदार अफजल खानाचा वध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या विशिष्ट शस्त्राचा वापर केला?

७. मुगल संपत्तीचा मेरूमणी असलेले हे “हिऱ्यांचे शहर” मुंबईच्या आधी एक ब्रिटिश बंदर देखील होते. शिवाजी महाराजांनीं महाराष्ट्राबाहेरील केलेला पहिला हल्ला याच शहरावर होता. हे शहर कोणते?

८. मुगलांच्या कोणत्या प्रसिद्ध राजपूत सेनापतीकडून शिवाजी महाराजांना सन १६६५ मध्ये सर्वात मोठा पराभव सहन करावा लागला?

९. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शिवाजी महाराज दक्षिणेत कोठपर्यंत (किती लांबपर्यंत) गेले होते?

१०. राज्य व्यवहार कोश हा शिवाजी महाराजांनी तयार केलेला एक शब्दकोश होता. तत्कालीन प्रशासनात वापरल्या जाणार्‍या कोणत्या भाषेची जागा घेण्याचा प्रयत्न या द्वारे केला होता?

११. जमीन महसूल आणि सैन्याबाबत शिवाजी महाराजांचा कोणता निर्णय त्यांच्या यशाचा प्रमुख घटक मानला जातो?

१२. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्या लोकप्रिय घोषणेचा उगम शिवाजी महाराजांच्या दूरगामी विचारसरणीतून झाला होता?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In