कर्नाटकातील बसवेश्वर, किंवा बसवण्णा हे एक संत, कवी आणि प्रखर समाजसुधारक होते. भारताच्या महान आध्यात्मिक गुरूंच्या पंक्तीत त्यांचे स्थान आहे.
बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११३१ च्या सुमारास कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात एका उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. ‘संगम पावणाऱ्या नद्यांचा अधिपती’ (Lord of the meeting rivers) या शिवाप्रती त्यांनी रचलेल्या काव्यामुळे, त्यांना कन्नड भक्ती साहित्यात अग्रणिय स्थान प्राप्त झाले. त्यांनी शेकडो ‘वचने ‘ रचलेली आहेत . ही कन्नड भाषेतील अशी भक्तीपर रचना आहे, जी नेहमी प्रामुख्याने गायली जावी अशी अपेक्षा असते. ‘वचन’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘गद्य’ असा होतो. त्यांना वचन साहित्याचे एक अध्वर्यू मानले जाते.
त्यांनी ‘अनुभव-मंडप’ नावाची एक सामाजिक-धार्मिक संस्था स्थापन केली. हे आध्यात्मिक चर्चांसाठीचे एक मुक्त व्यासपीठ होते. या व्यासपीठाकडे देशभरातील शेकडो संत आणि आध्यात्मिक साधक आकर्षित झाले.
बसवेश्वरांनी जात व उपजातींमधील भेदाभेद, बालविवाह आणि विधवांवर होणारी दुर्व्यवहार या गोष्टींना प्रखर विरोध केला. या क्षेत्रांमध्ये, त्यांनी १९ व्या शतकातील हिंदू सामाजिक सुधारणा चळवळींचा वेध, त्या चळवळी उदयास येण्यापूर्वीच कित्येक शतके आधी घेतला होता.
स्रोत आणि छायाचित्र सौजन्य: Basaveshwara, Sahitya Akademi.