93

जन्माष्टमी प्रश्नमंजुषा

आपण द्वारका, मथुरा आणि वृंदावन कृष्णभूमी म्हणून ओळखतो. भारतात आणखीही अनेक सुंदर ठिकाणे आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांवर घेऊन जात आहोत, जिथे कृष्णाने वास्तव्य केले, प्रेम केले, युद्ध केले, युक्ती केली आणि शिकवले. चला सोबत, बासरीच्या वाटेवर!

या प्रश्नमंजुषेमधील चित्रे Tiny Tot Publications आणि Shanti Publications यांच्या कृष्णावरील पुस्तकांमधून घेतली आहेत.

पाच भाग्यवान सहभागींना ‘Essential Ramayana’ हे अर्जुन भारद्वाज यांचे उत्कृष्ठ पुस्तक भेट देण्यात येईल. आम्हांला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की ही IndiYatra Quizzes ची पाचव्या वर्षाची सुरुवात आहे.

वसुदेव नवजात कृष्णाला नदी पार करून मध्यरात्री नन्द आणि यशोदेकडे घेऊन गेले. वसुदेव कृष्णाला घेऊन कुठे गेले होते?

सात दिवस चालू असलेल्या इंद्रदेवाच्या कोपापासून(मुसळधार पावसापासून गुराखी व पशुधनाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर तोलून धरला होता. कोणता प्रसिद्ध खाद्यपदार्थ ह्या घटनेनन्तर शोधला गेला.

कृष्ण, बलराम आणि उद्भव यांना गुरु सांदीपनी ऋषींकडे औपचारिक शिक्षणासाठी कोणत्या शहरात पाठवण्यात आले?

प्रभास येथे यादवांमध्ये आपसांत युद्ध झाले आणि येथेच भगवान श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य समाप्त केले .प्रभास किनारपट्टीजवळ वसलेल्या कोणत्या शहराजवळ आहे?

जैन आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र समजले जाणारे गिरनार हे तीर्थक्षेत्र आहे. ह्याच ठिकाणी एक रत्न मिळवण्यासाठी कृष्ण व जांबवानात २८ दिवस युद्ध झाले. कुठले रत्न होते ते?

जरासंधाच्या आक्रमणांमुळे बलराम व कृष्ण समुद्राजवळील एका टेकडीवर गेले ते प्राचीन काळातील शहर गोमंतक म्हणजे आजचे कोणते शहर?

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या
कौंडिण्यपूरातून श्रीकृष्णाने कुणाचे अपहरण केले?

पांचाल देशातील कुठल्या राजधानीच्या ठिकाणी द्रौपदी स्वयंवर संपन्न झाले?

भीम, जरासंधाला मारण्यासाठी भीम, अर्जुन आणि श्रीकृष्ण वेषांतर करून मगध देशात कुठल्या ठिकाणी गेले होते?

जिथे गोकुळ सोडल्यावर कृष्णाने आपले बहुतांश बालपण व्यतीत केले असे ब्रजभूमीतील कोणते गाव नन्दाचे घर म्हणून स्मरले जाते?

अर्जुन व कृष्णाने कोणते वन जाळले ,ज्याची भूमी राहण्यायोग्य केली आणि त्यावरच पुढे इंद्रप्रस्थ बांधले गेले.

प्राग्ज्योतिषपूर येथे कृष्णाने नरकासुराचा वध केला.तिथे दिवाळी किंवा नरक चतुर्दशीचा दिवस ह्या प्रसंगाची आठवण म्हणून मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. हे प्राग्ज्योतिषपूर भारतात कुठे आहे?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In