कुबेर जेव्हा कैलास पर्वतावर गेला तेव्हा त्याने पार्वतीकडे वासनापूर्ण नजरेने पाहिले, त्यामुळे तिला राग आला. कुबेराच्या त्या वासनेतून लोभासुराचा जन्म झाला.
शुक्राचार्यांकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोभासुराने तिन्ही लोक पादाक्रांत केले. रैभ्य ऋषींनी दिलेल्या सल्ल्यानुसार देवांनी गजाननाची आराधना केली. गजाननाच्या केवळ अस्तित्वामुळे लोभासुराचे मन पश्चात्तापाने भरून गेले आणि त्याने त्वरित शरणागती पत्करली.
या कथेमधून हे कळते की आत्मसाक्षात्कार हा लोभाचा नाश करतो. गजाननाचे हत्तीचे डोके हे या आत्मसाक्षात्काराच्या प्रवासाला लागणारा संयम, अतिसूक्ष्म गोष्टींची जाण आणि त्यावर दिलेले लक्ष तसेच ताकद यांचे प्रतीक आहे.
टिप्पणी – कामना कृष्णा आणि अभिलाषा हे लोभ याचे समानार्थी शब्द असले तरी लोभ हा हीन प्रतीची वासना दर्शवतो.