अल-बिरुनी हे महमूद गझनीच्या सैन्यासोबत भारतात आले होते. त्यांनी ‘तहकीक-ए-हिंद’ (भारताचा शोध) हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी दिवाळीचे वर्णन केले आहे.
त्यांच्या वर्णनानुसार, कार्तिक महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच अमावास्येचा दिवस, जेव्हा सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो, तो दिवस दिवाळी म्हणून ओळखला जातो. या दिवशी लोक स्नान करतात, नवीन आणि उत्सवी कपडे परिधान करतात, एकमेकांना सुपारी व पानांची भेट देतात. मंदिरांमध्ये जाऊन दानधर्म करतात आणि दुपारपर्यंत आनंदाने उत्सव साजरा करतात. रात्री सर्वत्र असंख्य दिवे लावले जातात, त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रकाशमय होते.
या उत्सवामागील कारण सांगताना अल-बिरुनी लिहितात की, वासुदेवाची पत्नी लक्ष्मी वर्षातून एकदा याच दिवशी विरोचनाचा पुत्र बळी याला मुक्त करते. बळी सातव्या पाताळात कैद होता. त्यामुळे या उत्सवाला ‘बलीराज्य’ असे म्हटले जाते, म्हणजेच बळीचे राज्य.
दिवाळीनंतरचा दुसरा दिवस ‘बळीप्रतिपदा’ म्हणूनही ओळखला जातो. विशेष म्हणजे, अल-बिरुनी यांनी केलेले दिवाळीचे वर्णन आजच्या काळात दिवाळी ज्या पद्धतीने साजरी केली जाते, त्याच्याशी बरेच साम्य दर्शवते.