0

शिवरात्री प्रश्नमंजुषा

आपल्या सर्वांसमोर इंडियात्राची १००वी प्रश्नमंजुषा सादर करताना अत्यंत आनंद होत आहे.आपल्या सर्वांच्या सहभागाबद्दल आपले खूप खूप आभार!

मंडळी,महादेव शिवाच्या असंख्य कथा आहेत, अगणित वेळा सांगितल्या गेल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी, आपण शिवाच्या,इतर देवतांबरोबरच्या, त्याच्या भक्तांबरोबरच्या आणि त्याच्या शत्रूंबरोबर असलेल्या काही महत्त्वपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कथांचा आस्वाद घेऊ.तो जगाचे रक्षण कसे करतो, जगाचा नाश कसा करतो आणि त्याला पुनरुज्जीवित कसा करतो हे पाहू. इतका सामर्थ्यशाली असूनही,तो मर्त्यमानवासारखाच प्रेम आणि नशिबाच्या पूर्णपणे अधीन कसा असतो हेही जाणून घेऊ.
इंडियात्राच्या ह्या गौरवपूर्ण वाटचालीच्या निमित्ताने, २० भाग्यवान सहभागींना प्रसिद्ध लेखक,श्री.विक्रम संपथ लिखित “Waiting for Shiva” हे पुस्तक भेट म्हणून मिळेल.

लिंगोद्भव कथेमध्ये,अनंत(अंतहीन) स्तंभाचा शोध घेण्यासाठी भगवान विष्णूंनी कोणाचा अवतार घेतला?

कनखल हे जिथे सतीच्या आत्मदहन केले ते स्थान आहे, शिव तांडव करू लागला.
कनखल कोणत्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राजवळ आहे?

शिवाने कुणाचा वध केला व पार्वतीबरोबर लग्न झाल्यावर त्याला पुन्हा जीवित केले?

भगवान शंकराने दिव्य पाशुपतास्त्र कुठल्या वीर योद्ध्याला त्यांच्यातील द्वंद्वयुध्दानंतर दिले?

अपस्मार असुर जो नटराज शंकराच्या पायाखाली आला , काय दर्शवतो?

त्रिपुरांतक हे शिवांचे नाव आहे. ब्रह्मदेव सारथी म्हणून आणि विष्णू अस्त्र म्हणून, त्यांनी तीन शहरांचा नाश केला. या तीन शहरांचा वर कोणत्या असुराला मिळाला होता?

आपल्या अत्यंत कट्टर भक्ताकरिता ,बाणासुरासाठी,शिवशंकर एका देवाशी लढले. कोण होता हा लोकप्रिय देव?

भगवान शंकराला देखील साडेसाती च्या ज्योतिषशास्त्रीय आव्हानाला सामोरे जावे लागते.हा काळ कुठला
खगोलीय शक्ती नियंत्रित करते?

शिव अविमुक्त असे ज्याचे दुसरे नाव आहे,अशा शहराला, ब्रह्मांड विघटन होताना
विनाशापासून वाचवण्यासाठी त्यांच्या त्रिशूळाने आधार देतात. हे नाव कोणत्या पवित्र शहराला आहे?

शिव शंकरांच्या ‘जग शक्तीशिवाय राहू शकते’ ह्या दाव्याच्या प्रत्युत्तरादाखल देवी पार्वतीने असे रूप धारण केले की जे स्वतःच जीवसृष्टी धारण करू शकेल.
हे कोणते रूप आहे?

अंधकासुर हा शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे. त्याला ज्याने दत्तक घेतले तो पालक पिता विष्णूच्या वराह अवताराकडून मारला गेला. हा पिता कोण होता?

शिव ‘कालान्तक’ म्हणून ओळखले जातात कारण ते लिंगातून प्रकट होऊन त्यांच्या भक्ताला, ज्याला तरुण वयात मृत्यू घ्यायला आला होता, वाचवले. कोण आहे हा प्रसिद्ध भक्त?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In