राजमाता म्हणून अहिल्याबाई अतुलनीय होत्या. अधिकृत पत्रे आणि इतिहासकार तसेच प्रतिस्पर्धी शासकांच्या नोंदी अहिल्याबाईंच्या प्रशासन, मुत्सद्देगिरी, राजकारण, न्याय आणि दान यातील प्रावीण्य मान्य करतात. नाना फडणवीस, जदुनाथ सरकार, कवी मोरोपंत, जॉन माल्कम आणि विनोबा भावे यांनी अहिल्याबाईंच्या कारकिर्दीचे आणि प्रावीण्याचे कौतुक केले आहे.परंतु अहिल्याबाईंचे वैयक्तिक जीवन दुर्दैवी होते. त्यांचे पती आणि मुलगा व्यसनाधीन झाले आणि तरुण वयात मरण पावले. त्यांनी त्यांचा नातू आणि जावई यांनाही तरुण वयात गमावले. त्यांनी तुकोजीला दत्तक घेतले आणि त्याला सुभेदारी दिली, परंतु नंतरच्या काळात त्यांच्याशी मतभेद झाले. त्यांना उशिरा जाणीव झाली की त्यांनी होळकरांमध्येच वारस शोधण्याऐवजी कोणत्याही सक्षम योद्ध्याची निवड करायला हवी होती. शेवटी, त्यांनी सासर्यांच्या विनंतीमुळे स्वतः सती जाणे टाळलं, परंतु त्यांच्या सून आणि मुलीला सती जाण्यापासून थांबवू शकल्या नाहीत.ही प्रथा त्यांनाही पसंत नव्हती. त्यांनी विधवांना मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केले, तरी त्या सती बंद करण्यासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळवू शकल्या नाहीत.