
नमस्कार,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेत आपले स्वागत आहे. ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा प्रामाणिक हेतू आहे.
आजपासून म्हणजेच ,२७ मे २०२५पासून आपण एक पाच प्रश्नमंजुषांची एक मालिका प्रसारित करत आहोत. त्यामध्ये लोकमातेचे जीवन, त्यांचे घराणे, होळकर घराणे ,त्यांच्या उपलब्धी व त्यांचे कार्य व वारसा ह्यावर आधारित प्रश्न असतील.
रोज सकाळी ६वाजता आम्ही प्रश्नमंजुषा प्रसारित करू.
आपल्याला सर्व प्रश्नमंजुषा https://indiyatra.in/ahilyabai-quizzes/ इथे दिसतील व आम्ही रोज एक प्रश्नमंजुषा त्यात सामील करत जाऊ.अशा एकूण पाच प्रश्नमंजुषांची ही मालिका असेल.
३१मे २०२५ रोजी आम्ही live quiz
प्रसारित करू.
संध्याकाळी ६ च्या सुमारास ही लिंक indiyatra संकेतस्थळावरील हा दुवा उपलब्ध होईल.तेथे QR कोड देखील असेल.तुम्ही मोबाईल फोन वरून कोड स्कॅन करून सहभाग नोंदवू शकता.
ही दहा मिनिटांची प्रश्नमंजुषा असेल.एकूण गुण व लागणारा वेळ ह्यावरून आपण ५विजेते घोषित करू त्यांना लोकमाता अहिल्याबाईंवरील एक पुस्तक सप्रेम भेट देण्यात येईल.
शुभास्ते पन्थान:।