नजीब खानला अब्दालीने दिल्लीचा नियंत्रक बनवले होते.तो दिल्लीचा सर्वेसर्वा होता. मराठ्यांनी दिल्लीवर केलेला हल्ला दीर्घकाळ चालला आणि अखेरीस नजीब खानला पकडण्यात आले. मध्यस्थांमार्फत त्याने मल्हार राव यांना पैशांच्या बदल्यात मुक्त करण्याची ऑफर दिली. मराठा सैन्याचा विरोध असतानाही मल्हार राव यांनी ह्याला पाठिंबा दिला.नजीब खानला पैशांच्या बदल्यात मुक्त करण्यात आले, परंतु त्याने पानिपतच्या युद्धात पुन्हा अब्दालीशी युती केली. या घोडचुकीमुळे मल्हारराव यांना अपमान सहन करावा लागला. अहिल्याबाई यांनी त्यांचे सांत्वन करून ,त्यांना उभारी देऊन, उत्तर भारतातील मराठा प्रदेश पुन्हा मिळवण्यात मदत केली.