जेव्हा पांडव वनवासाला निघाले तेव्हा काही ब्राह्मणांनी त्यांच्या नातेवाईकांसह पांडवांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. पांडवच वनवासात असताना ब्राह्मणांना कसे खायला घालावे याची युधिष्ठिराला चिंता सतावत होती. पांडवांचा पुरोहित, धौम्यऋषी ह्यांनी युधिष्ठिराला सांगितले की सूर्य सर्वांना सर्व पुरवतो आणि त्यांनी युधिष्ठिराला सूर्याकडे जाण्यास सांगितले. युधिष्ठिराने दिवाकर पूजा केली.सूर्यदेव प्रसन्न झाले व युधिष्ठिराच्या समोर प्रकट होऊन पांडवांच्या स्वयंपाकघरात फळे, मुळे, मांस आणि भाज्या ह्या चार प्रकारच्या अन्नाची कमतरता भासणार नाही याची ग्वाही त्यांनी
युधिष्ठिराला दिली.
महाभारताच्या संशोधनात्मक आवृत्तीत, अक्षय पात्राचे उल्लेख नाही. इतर आवृत्त्यांमध्ये आणि लोकप्रिय कथांमध्ये, सूर्यदेवाने युधिष्ठिराला अक्षयपात्र भेट दिले
दिले जे अन्नाचा अक्षय्य पुरवठा करेल, जोपर्यंत ते पूर्णपणे रिकामे केले जात नाही. नंतर, जेव्हा दुर्वास मुनी आपल्या सेवकांसह पांडवांना भेटायला गेले,तेव्हा द्रौपदी घाबरली कारण तिने आधीच जेवण करून ते भांडे रिकामे केले होते. तिने कृष्णाची आळवणी केली. कृष्णाने अक्षय पत्रामध्ये अन्नाचा एक तुकडा अजूनही शिल्लक आहे हे द्रौपदीला दाखवलं. त्याने तो अन्नाचा तुकडा खाल्ला.
चमत्कारिकरीत्या दुर्वासा आणि त्याचे शिष्यही एकाच वेळी तृप्त झाले. द्रौपदीची एका कठीण प्रसंगातून सुटका झाली.
स्रोत: अर्जुन भारद्वाज आणि हरी रविकुमार. अत्यावश्यक महाभारत
Picture – Rock art believed to be Pandavas and Draupadi with Akshaya Patra at Amba Teerth, Karnataka