109

भारतीय अभियांत्रिकी प्रश्नमंजुषा


आज विश्वकर्मा दिवस आहे.
प्रथम ऋग्वेदामध्ये विश्वकर्मांचा आदरयुक्त उल्लेख आढळतो ज्यांची अभियांत्रिकीच्या देवतेच्या स्वरूपात पूजा केली जाते. याच दिवशी विश्वकर्माची पूजा केली जाते.
आधुनिक काळात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी तंत्रज्ञानातील ह्या उत्कृष्ठतेच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले आणि त्यांचा वाढदिवस (१५ सप्टेंबर) अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
चला तर, या प्रश्नमंजुषेद्वारे आपण धातुशास्त्र, सिंचन आणि रस्ते बांधणीमध्ये भारतीय संस्कृतीच्या अद्वितीय कामगिरीवर प्रकाश टाकूया! आजची प्रश्नमंजुषा ही आपल्या या पूर्वी काढलेल्या ‘भारतातील तंत्रज्ञान’ या प्रश्नमंजुषेची पुढील पायरी आहे आणि ती ‘indiyatra.in’ ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आजच्या प्रश्नमंजुषेमधील पाच भाग्यवान स्पर्धकांना बिबेक देबरॉय यांचे भगवद्गीता हे पुस्तक भेट म्हणून प्राप्त होईल.

१) मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा केला जातो. त्यांनी कोणते मोठे धरण बांधले जे आज कर्नाटक आणि तामिळनाडूला पाणीपुरवठा करते?

२) शिवगलाई आणि इतर ठिकाणी नुकत्याच राबवण्यात आलेल्या पुरातत्त्वीय शोधांवरून असे समजते की लोखंड वितळण्याचे काम ५००० वर्षे जुने असावे. हे शिवगलाई कुठे आहे?

३) तमिळनाडूमधील पहिल्या शतकातील कल्लनई धरण हे कदाचित भारतातील सर्वात जुने आणि आजसुद्धा वापरात असलेले धरण आहे. कोणत्या राजवंशाने हे धरण बांधले होते?

४) ____या राजवंशाच्या दगडी शिल्पांवर पाटणा संग्रहालयातील प्रसिद्ध दिदारगंज यक्षी या शिल्पामध्ये आकर्षक आणि गुळगुळीत पृष्ठभागासह सजावट आहे. सदर राजवंशाचे नाव सांगा.

५) भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे राणी कि वाव. सदर राणी कि वाव हि सुंदरतेचा सुद्धा उत्कृष्ठ नमुना आहे सदर राणी कि वाव कोठे आहे?

६) खूप कमी लोकांना ज्ञात असणाऱ्या दक्षिणेकडील _____या राजवंशाने शंखजीरा. (सोप स्टोन ) दगडापासून सुंदर कोरीवकाम करून चांदणीच्या आकाराची मंदिरे बांधली. त्यांनी लेथसारख्या फिनिशसह खांब बनवले. हे राजघराणे कोणते आहे?

७) हंपी येथील विठ्ठल मंदिर आणि इतर अनेक ठिकाणी एक मनोरंजक ध्वनिक वैशिष्ट्य आहे. ते काय आहे?

८) गंगा यमुना दोआबमध्ये कोणत्या मध्ययुगीन सुलतानाने विस्तृत सिंचन कालवे बांधले?

९) शेरशाह सुरी हे नाव ग्रँड ट्रंक रोडशी कायमचे जोडलेले आहे. ते कोणत्या दोन ठिकाणांना जोडते?

१०) नामदांग सिला साकू हा एकाच दगडापासून बनवलेला रस्ता पूल आहे. आपल्याला हा रस्ता कुठे पाहायला मिळेल?

११) हे युनेस्को वारसा स्थळ हवेत थंडावा प्राप्त होण्यासाठी व्हेंचुरी इफेक्ट वापरते आणि त्याचे प्रसिद्ध दृश्य त्याच्या मागच्या बाजूने दिसते. हे स्थळ कोणते आहे?

१२) केरळमधील अरनमुला हे GI टॅग असलेल्या तंत्रासाठी ओळखले जाते जे काचेचा वापर न करता आरसा बनवते. ते कशाचा वापर करते?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In