180

विनायक चतुर्थी प्रश्नावली

श्रीविष्णूप्रमाणेच श्रीगणेशानेही काही अवतार घेतले याची तुम्हाला कल्पना आहे का? या अवतारकाळात गणेशाने असूरांचा वध करण्याऐवजी त्यांच्या वर्तनात चांगले बदल घडवून त्यांना क्षमा केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुद्गल पुराणात अशा आठ अवतारांचे सुंदर वर्णन आहे. प्रत्येक अवतार हा अतिअहंकार, अतिलालसा अशा दोषांपासून मनुष्याला मुक्त करण्यासाठी घेतल्याचे दिसते. कोणत्या रूपाची आराधना कोणत्या दोषापासून मुक्ती देते हे तुम्हाला माहीत आहे का?

चला तर मग, या गणेश चतुर्थीला आपण या सर्व अवतारकथांचा अभ्यास करू. गणेशाच्या प्रगाढ बुद्धीविषयी तुम्हाला असलेल्या ज्ञानाची परीक्षा घेणारी ही प्रश्नमालिका मुख्यत्वेकरुन संकष्टी चतुर्थी मंडळ आणि अमर चित्र कथा यांवर आधारित आहे.उत्तरे देणाऱ्यांतील पाच भाग्यवंतांना नंदिता कृष्णा यांचे “Ganesha, The Auspicious, The Beginning” हे चित्रांसहित वर्णन करणारे पुस्तक देण्यात येईल.

गणेशाच्या एका अवतारात वळलेली सोंड आणि सिंह या वाहनाचे वर्णन आहे. या अवतारात त्याने मत्सरासुराचा वध केला. त्या अवताराचे नाव काय?

वक्रतुंडाची मदत घेण्याविषयी देवांना कोणी सल्ला दिला? त्याला तीन डोकी, सहा हात असून सोबत चार कुत्रे आणि एक गाय असल्याचे दाखवितात.

गणेशाने एकदंत या अवतारात मदासुराचा (दंभ/अहंकार) पराभव केला. एकदंत हे वेदांतातील कोणत्या तत्त्वाचे प्रतीक आहे?

सनतकुमारांनी ब्रह्मविद्या एक ऋषींना शिकवली. ते ऋषि कोण?

महोदर (मोठे पोट असलेला गणेश) आणि त्याने पराभूत केलेला मोहसुर (भ्रमाचे प्रतीक) या दोघांची उत्पत्ती कुठून झाली?

गजानन या स्वरूपात गणेशाने वासनेचा नाश केला त्या असुराचे नाव काय?

विष्णूच्या कोणत्या स्त्रीरूपाची शिवाला भुरळ पडली आणि क्रोधासुराचा जन्म झाला? गणेशाने याच क्रोधासुराचा पराभव करते वेळी लंबोदर हे रूप घेतले होते.

मोर हे वाहन असलेल्या विकट नावाच्या अवतारात गणेशाने कामासुराचा (अनियंत्रित इच्छांचे प्रतीक) पराभव केला. एक दैवत आणि वृंदा हे कामासुराचे जन्मदाते. त्या दैवताचे नाव काय?

विघ्नराज (अडचणींचे निराकरण करणारा) याने ममासुराला वश केले. मम या संस्कृत शब्दाचा अर्थ काय?

विघ्न राजाचे वाहन रामायणात लक्ष्मण म्हणून तर महाभारतात तेच बलराम म्हणून येते. हे वाहन म्हणजे कोण?

अभिमानासुर किंवा अहंकारासुर (गर्व आणि अहंकाराचे प्रतीक) याच्यावर गणेशाने धूम्रवर्ण या अवतारात विजय मिळवला. धूम्र याचा अर्थ काय?

मुद्गल पुराणात लिहिल्याप्रमाणे गणेशाने गजमुखासुर (हत्तीचा चेहरा असलेला राक्षस) याच्यावर विजय मिळवून त्याचे रूप बदलले. हे बदललेले रूप कोणते

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In