109

भारतातील पोर्तुगीज

आजच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर १९६१ रोजी, म्हणजेच भारतभूमी नंतर सुमारे १४ वर्षांनंतर गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाला झाला. पोर्तुगीज सत्ता ही भारतात सर्वप्रथम आलेली युरोपीय साम्राज्यशाही होय की जिचा कार्यकाळ १४९८ पासून १९६१ सालापर्यंत होता. प्रारंभिक काळात पोर्तुगीजांनी सागरी व्यापारावर प्रभुत्व प्रस्थापित केले होते मात्र लवकरच डच आणि ब्रिटिश यांनी त्यांना मागे सारले. गोवा हे पोर्तुगीज सत्तेचे भारतातील प्राथमिक ठिकाण बनले. मात्र तरीही ख्रिश्चन धर्मप्रमुख कार्डिनल ग्रेशियस यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत की “”गोव्यातील कॅथोलिक संस्कृती ही मूलतः ख्रिस्ती आहे पोर्तुगीज नव्हे””.

या प्रश्नमंजुषेमध्ये आपणास गोव्यातील पोर्तुगीजांच्या सत्ताकाळातील महत्त्वाच्या घटना, प्रमुख व्यक्तिमत्वे आणि संकल्पना याविषयी माहिती मिळेल; जी प्रामुख्याने M. N. Pearson यांच्या “”The Portuguese in India” आणि अ. का. प्रियोळकर यांच्या “”The Goa Inquisition” या पुस्तकांवर आधारित आहे.

१. इ.स. १४९८ मध्ये भारतात पोहोचणारा प्रसिद्ध पोर्तुगीज दर्यावर्ती कोण होता?

२. पोर्तुगीजांनी इ.स. १५१० मध्ये गोवा ताब्यात घेण्यापूर्वी तेथे कोणाचा अंमल होता?

कुठल्या मध्ययुगीन कॅथॉलिक चर्च ने गोवा येथील ख्रिस्ती नसलेल्या लोकाना त्रास दिला ?

कुठल्या ख्रिस्ती संताला गोंयचो साहेब असा किताब मिळाला होता ?

केरळमध्ये पोर्तुगीजांनी कोणत्या प्राचीन धार्मिक समुदायाचा छळ केला होता?

देवी श्री भगवतीची तिच्या माशेल, नवीन गोवा येथील देवस्थानापासून जुन्या गोव्यातील तिसवाडी इथपर्यंत वार्षिक यात्रा असते. ही यात्रा कशाचे स्मरण करून देते?

७. कोणत्या मराठा राजाने इ. स. १६८३ मधे गोवा (पोर्तुगीज अंमलातून) जवळपास पूर्णतः मुक्त केला होता?

८. भारतातील कोणते शहर पोर्तुगीजांकडून ब्रिटीशांना हुंडा म्हणून देण्यात आले होते?

९. पोर्तुगीज भारतातून मसाल्याचे पदार्थ निर्यात करीत. ते भारतात कशाची आयात करीत असत?

१०. दैनंदिन आहारातील पुढीलपैकी कोणता पदार्थ पोर्तुगीजांनी भारतात आणला?

११. पोर्तुगीजांनी इ. स. १५५६ मधे या इमारतीमध्ये एका युरोपियन नाविन्यपूर्ण व पथदर्शी तंत्रसेवेची उपलब्धता मधे केली; ती कोणती ते सांगा.

१२. भारतामधील अशी कोणती एक जुनी प्रथा आहे जिचे संबोधन एका पोर्तुगीज शब्दाने केले जाते?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In