226

प्रश्नमंजुषा – प्रमुख उपनिषदे

उपनिषदामध्ये गुरू-शिष्य परंपरेचे मूर्त स्वरूप दिसून येते. ‘उपनिषद’ या शब्दाचा अर्थ आहे ‘उप’ (जवळ), ‘नि’ (पूर्ण समर्पणाने), ‘सद्’ (बसणे) म्हणजेच गुरूच्या सान्निध्यात बसून ज्ञान प्राप्त करणे.

प्रमुख उपनिषदे एकूण १० (किंवा १३) आहेत. यावर शंकराचार्य, रामानुजाचार्य यांसारख्या महान गुरूंनी भाष्य केले आहे.

प्रमुख उपनिषदे, वास्तवाचे स्वरूप ‘ब्रम्ह सत्य, जगत् मिथ्या’ या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात कसे उलगडतात हे आपल्याला ह्या प्रश्नमंजुषेत पाहता येईल!

प्रश्नांची क्रमवारी पारंपरिक प्रमुख उपनिषदांच्या क्रमावर आधारित आहे, जरी शेवटची दोन उपनिषदे ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात जुनी आहेत.

ही प्रश्नमंजुषा उपनिषद अभ्यासक श्रीमती गीता कुलकर्णी यांच्या एम.फिल. प्रबंध व इतर स्रोतांवर आधारित आहे. यासाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

ह्या ज्ञानयात्रेत आम्ही शिकतच आहोत,आणि त्यामुळे प्रश्नमंजुषेतील चुकांची (असल्या तर) जबाबदारी सर्वस्वी आमची आहे.

ईशोपनिषद आपल्याला शिकवते की, जर आपला दृष्टिकोन योग्य असेल, तर आपल्या कृतीचे कर्म आपल्याला बांधून ठेवत नाही.
अशा तत्त्वज्ञानाचा उपदेश खालीलपैकी आणखी कोणत्या ग्रंथात आढळतो?

पहिल्याच प्रश्नात्मक मंत्रामुळे केनोपनिषदाला हे नाव मिळाले आहे. ‘केन’ या शब्दाचा अर्थ काय?

कठोपनिषद ‘इंद्रिये, मन, बुद्धी आणि आत्मा’ यांच्यातील संबंध समजवण्यासाठी कोणते उदाहरण वापरते?

प्रश्नोपनिषद कोणत्या प्रतीकाच्या महत्त्वावर भर देते, ज्याचा जप हिंदू धार्मिक आचरणाचा एक मूलस्तंभ आहे?

आपल्या देशाचे घोषवाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे.ते खालीलपैकी कोणते आहे?

मांडुक्य उपनिषदात, जागृती, स्वप्न व सुषुप्ती ह्या अवस्थांव्यतिरिक्त अजून एका चौथ्या अवस्थेचा उल्लेख केला आहे. ती चौथी अवस्था कोणती?

तैत्तिरीय उपनिषदानुसार मानवी व्यक्तिमत्त्व किती आवरणांनी (कोशांनी) बनलेले आहे?

ऐतरेय उपनिषदाच्या रचेत्यांच्या पार्श्वभूमीमुळे कधी कधी ऐतरेय उपनिषदाला ‘एका ____ने रचलेला ग्रंथ’ असं म्हटले जाते.तर तो रचेता(रचनाकार ) खालीलपैकी कोण आहे?

छांदोग्य उपनिषदात ऋषी हरिद्रुमत गौतम यांनी कोणाच्या मुलाला शिष्य म्हणून स्वीकारले?

बृहदारण्यक उपनिषद ‘हे नाही, तेही नाही’ या नकार पद्धतीचा वापर करते. या पद्धतीद्वारे सर्वोच्च सत्य मानवी संकल्पनांमध्ये पकडता येत नाही, हे दर्शवले जाते. या तत्त्वज्ञानाला कोणत्या नावाने ओळखले जाते?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In