सतीने तिच्या ‘गरीब’ पती शिवाचा तिच्या पित्याने केलेला अपमान सहन न झाल्यामुळे आत्मदहन केले. तिच्या निधनानंतर शिवांनी कठोर ब्रह्मचर्याचे पालन केले. प्रेमदेव कामदेवाला, सतीचा पुनर्जन्म असलेल्या पार्वतीबद्दल शिवांच्या मनात प्रेमभाव जागृत करण्याचे कार्य सोपविण्यात आले. कामदेवामुळे शिव क्रोधित झाले आणि त्यांनी त्याला भस्मसात केले.
कामदेवाची पत्नी रतीच्या विनंतीने शिवांनी त्याला निर्गुण (देहहीन) स्वरूपात पुन्हा जीवदान दिले. होळी हा सण कामदेवाच्या पुनर्जन्माचा उत्सव मानला जातो.
होळीच्या आदल्या दिवशी पेटविण्यात येणारे अग्निकुंड (होळिका दहन) हे कामदेवाच्या दहनाचे प्रतीक मानले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये वसंतोत्सवाला ‘कामोत्सव’ आणि ‘मदनोत्सव’ अशी नावे आढळतात, जी कामदेवाशी असलेला संबंध दर्शवितात.
ही कथा भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात अधिक प्रचलित होती, तर होलिका-प्रह्लादाची कथा उत्तर आणि पूर्व भारतात अधिक लोकप्रिय होती. कालांतराने ही कथा काही प्रमाणात लुप्त झाली असली, तरी दक्षिण भारतातील काही भागांत ती आजही स्मरणात आहे.
महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांत ‘धुळवंदन’ हा सण होळीचा एक भाग मानला जातो. तो कामदेवाच्या भस्माचे (धूळ) उधळण (वंदन) करून त्याच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करण्याचे प्रतीक आहे.
स्रोत : नागराज पाटुरी
https://indiafacts.org/holi-kaamotsava-age-old-hindu-festival-love/
The 1890 painting is Shiva burning Kamadeva.