208

भारतीय ग्रीष्म रुतूवर आधारित प्रश्नमंजुषा

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला. आधुनिक वास्तुकला वातानुकूलन (एअर कंडिशनिंग) यांसारख्या ऊर्जेवर आधारित साधनांच्या मदतीने उष्णतेचा सामना करते. परंतु पारंपरिक वास्तुकला निसर्गाच्या साहाय्यानेच उष्णतेवर मात करत असे. पारंपरिक वास्तुशास्त्रातील नैसर्गिक किंवा निष्क्रिय शीतलीकरण (Passive Cooling) प्रणालींची आठवण करून देण्याची हीच योग्य वेळ आहे.

बारव (Stepwells) या केवळ पाणीसाठ्याच्या रचना नव्हत्या, तर नैसर्गिकरित्या थंड राहणाऱ्या सामुदायिक जागाही होत्या. खालीलपैकी कोणते राज्य आपल्या बारवांसाठी विशेष प्रसिद्ध आहे?

आधुनिक इमारतींमध्ये सजावटीचा घटक मानला जाणारा कोणता वास्तुशिल्पीय घटक पारंपरिक इमारतींमध्ये थंडावा निर्माण करण्याचे महत्त्वाचे साधन होता?

घरातील अंतर्गत भाग शीतल ठेवण्यासाठी सर्वसामान्य घरांमध्येही ओले पडद्यांचा वापर केला जात असे. हे पडदे कुठल्या पदार्थापासून बनवलेले जात असत

पारंपरिक केरळी पद्धतीच्या घरांमद्धील “ नालूकेट्टू” व “नाडूमुट्टम” हे कोणते भाग आहेत

जुन्या इमारतींमध्ये खिडक्यांवर असलेल्या बाहेर झुकलेल्या छपरास काय म्हणतात? हे सूर्यापासून सावली देण्याचे तसेच मुसळधार पावसापासून संरक्षण करण्याचे काम करते.

झरोखा म्हणजे काय?

जयपूरमधील कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Site) जाळीदार खिडक्यांच्या (जाली) वापरामुळे थंडावा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहे?

राजस्थानी हवेल्यांमध्ये छताच्या वर असलेला खुला मनोरा ‘बदगीर’ (पर्शियन भषेत) म्हणून ओळखला जातो. या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे?

मोठ्या भिंतींमध्ये लहान खिडक्या असणे वायुवीजनासाठी अधिक चांगले असते. हे विधान खरे की खोटे?

चीनच्या विशाल भिंतीनंतर (Great Wall of China) जगातील दुसरी सर्वात लांब भिंत राजस्थानमध्ये आहे. ती इतकी जाड आहे की ती ‘थर्मल बॅटरी’प्रमाणे काम करते, म्हणजेच उष्णता साठवून ठेवते. ती नेमकी कुठे आहे?

‘काठ-कुनी’ वास्तुकला भूकंप-प्रतिरोधक तसेच उष्णतारोधक दोन्ही प्रकारची असते. ती तुम्हाला कुठे आढळते?

बंगालची ‘चाला’ वास्तुकला प्रसिद्ध आहे. ‘चाला’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In