पारंपरिक वास्तूंमध्ये दिवसातील वेगवेगळ्या वेळांनुसार आणि हवामानानुसार वेगवेगळ्या जागांचा वापर केला जात असे. गुजरातमधील बारवा (Stepwells) या भारताच्या उत्कृष्ट वास्तुशिल्पीय कामगिरींपैकी एक मानल्या जातात. जरी त्यांची निर्मिती मुख्यतः पाणीसाठ्यासाठी करण्यात आली होती, तरीही उन्हाळ्यातील उष्ण दुपारी त्या लोकांच्या भेटीगाठी आणि सामाजिक संवादाच्या ठिकाणांमध्ये रूपांतरित होत असत. बारवांमधील पाणी परिसराला नैसर्गिक थंडावा देत असे.
हिवाळ्यात बारवांतील वातावरण खूपच थंड असल्याने लोक मोकळ्या जागेत विसावा घेत असत. पावसाळ्यात ते पडवीचा (व्हरांड्याचा) उपयोग करत असत.
अलीकडच्या काळापर्यंत उत्तर भारतात उन्हाळ्याच्या उष्ण दिवसांत लोक घरांच्या खालच्या मजल्यांवर राहात असत, तर रात्री गार वारा मिळावा म्हणून छतावर झोपत असत. हिवाळ्यात मात्र याच्या उलट व्यवस्था असे.
चित्रात एका बारवेचा छेददृश्य (section view) दाखविला असून, उन्हाळ्यात दिवसातील विविध वेळांनुसार वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पडव्या (व्हरांडे) दर्शविल्या आहेत.
मूळ स्त्रोत- विनोद गुप्ता- “इंडिजिनीअस् आर्किटेक्चर अॅंड नॅचुरल कूलींग”