“असे नितांतसुंदर प्रेमकाव्य इतर कोणत्याही भाषेत नाही” असे मेघदूत (किंवा मेघसंदेश) या काव्याचे वर्णन किंकेड यांनी केले आहे.
धनरक्षक कुबेराच्या सेवेत असलेल्या एका यक्षाला राजधानी अलकानगरीतून हद्दपारीची शिक्षा मिळाल्यामुळे तो मध्य भारतातील एका पर्वतावर येऊन राहिला होता. आपल्या प्रेमिकेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या त्या यक्षाने स्वतःच्या मनाची व्यथित अवस्था एका मेघाने अलकानगरीतील आपल्या प्रेमिकेपर्यंत पोहोचवावी यासाठी त्या मेघाला केलेले कथन अशी या महाकाव्याची मांडणी आहे.
महर्षी वाल्मिकींची प्रतिभा आणि रामाची सीतेविषयी माहिती मिळावी यासाठीची तळमळ यांपासून कालिदासाने प्रेरणा घेतली आहे. एके ठिकाणी हा यक्ष म्हणतो की वनवासात असताना राम आणि सीता ह्याच पर्वतावर राहिले होते जिथे मला आता दुर्दैवाने हद्दपार म्हणून राहावे लागते आहे. त्याने मेघाला सल्ला दिला आहे की ‘सावकाश जा, पाऊस पाड, अरण्यात लागलेले वणवे दिसले तर ते शांत कर, सर्वांना तुझा फायदा होऊ दे’. कालिदासाने त्या मेघाला आकाशमार्गाने जाताना जमिनीवर कोणती स्थाने, खुणा दिसतील याचे अत्यंत सविस्तर वर्णन केले आहे. हा मार्ग सध्याच्या उत्तर भारतावरून जातो.
एक यक्ष (लोकविलक्षण मनुष्य) आणि एक ढग (नैसर्गिक वस्तू) यांच्या पूर्णतः काल्पनिक संभाषणामधे कालिदासाने काव्य, भूगोल, दिव्य प्रेम आणि भक्ती यांचा सुंदर मेळ केला आहे. काही शतकांनंतर शेक्सपिअरने जेव्हा “वेडा, प्रियकर आणि कवी हे सर्व कल्पनाशक्तीचेच बनलेले असतात” असे लिहिले (A Midsummer Night’s Dream) तेव्हा त्याने जणू कालिदासाचेच विचार पुन्हा मांडले.
मेघदूत हे संपूर्ण महाकाव्य लिहिताना मंदाक्रांता हे संथ वृत्त वापरले आहे. ढगाचा कमी वेग आणि काव्यातील दुःख यांच्याशी त्याची अतिशय चपखल सांगड घातली आहे.
दिलेली प्रतिमा ही अबनींद्रनाथ टागोर यांच्या The Banished Yaksha या मेघदूतावरील चित्राची असून विकिमिडियातून घेतली आहे.
संदर्भ – K.S.Ramaswami Sastri यांचे Kalidasa: His Period, Personality & Poetry हे पुस्तक