200

भारतीय नववर्ष प्रश्नमंजुषा

आज भारतात गुढीपाडवा, उगादी आणि त्यासारख्या विविध सणांच्या रूपात नवीन वर्ष सुरू होत आहे. हे नववर्ष चांद्र-सौर (Luni-Solar) भ्रमणावर आधारीत आहे. काही प्रांतांमध्ये बैसाखी आणि अन्य नावांनी देखील नववर्ष साजरे केले जाते, ते वसंतसंपात काळ (Vernal Equinox) म्हणजे सूर्य विषुववृत्त पार करतो ही खगोलशास्त्रीय घटना साजरी करण्याचा सण आहे.
पुराणांमध्ये खगोलशास्त्राचे अतिशय विस्तृत ज्ञानभांडार रंजक कथारूपाने गुंफले आहे. आजच्या नववर्षानिमीत्त प्रश्नमंजुषेत बारा खगोलशास्त्रीय कथा समाविष्ट केलेल्या आहेत. स्रोत: प्रा. डॉ. राज वेदम् (भारतीय इतिहास व तत्वज्ञान यांचे अभ्यासक) यांची व्याख्याने.

१. चंद्राला २७ पत्नी आहेत ज्या रात्रीच्या आकाशाच्या २७ भागांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना काय नावाने ओळखले जाते?

२. आपल्या २७ पत्नींमध्ये चंद्राचे रोहिणी हिच्यावर जास्त प्रेम होते. हे कोणत्या खगोलशास्त्रीय संकल्पनेशी निगडीत आहे?

३. दक्षाने चंद्राला मृत्यूचा शाप दिला, मात्र भगवान शंकरांनी त्यावर उःशाप दिला मात्र त्यामुळे त्या शापाचा पूर्ण परिहार झाला नाही. चंद्राशी संबंधित कोणते वैशिष्ट्य या शाप आणि उःशाप घटनेशी निगडित आहे?

४. सप्तर्षींच्या सहा पत्नींनी आपल्या पतींना सोडून वेगळा नक्षत्रसमूह बनवला. त्या नक्षत्रसमूहाला काय म्हणतात?

५. अनेक हिंदू विवाह विधींमध्ये नवदांपत्य आपल्या वैवाहिक सौख्याचे प्रतिक म्हणून एका ताऱ्याचे दर्शन घेतात. तो तारा कोणता?

६. इंग्रजीत ज्याला Pole Star संबोधले जाते त्याच्या संस्कृत भाषेतील नावाचा अर्थ दृढ, अचल अथवा भक्कम आहे. त्या ताऱ्याचे नाव काय आहे?

७. विंध्य पर्वताला हिमालयापेक्षा उंच होण्यापासून कोणत्या मुनींनी रोखले?

८. नवग्रहांपैकी अदृष्य असणारे आणि ग्रहणास कारणीभूत होणारे असे दोन ग्रह कोणते?

९. शनी या नावाचा एक अर्थ ‘सावकाश चालणारा’ असाही आहे. असे का?

१०. दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा हा कोणत्या ग्रहाच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणावर आधारीत आहे?

११. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांचा कोणत्या गुणविशेषामुळे शुक्र ग्रहाशी संबंध जोडला जातो?

१२. भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितल्यानुसार ते कोणत्या महिन्यात मूर्तरूपात प्रकटतात?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In