स्वरभानू हा एक असुर आहे, ज्याचा उल्लेख ऋग्वेदाच्या अगदी सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये ग्रहण लागण्यास कारणीभूत ठरणारा म्हणून आढळतो. एका पौराणिक कथेत, त्याने स्वतःला देव असल्याचे भासवले व समुद्रमंथना दरम्यान अमृताचे (सुधेचे) प्राशन केले. सूर्य आणि चंद्र यांच्या हे लक्षात आले व त्यांनी ते श्रीविष्णूंच्या निदर्शनास आणले. याकारणाने रुष्ट झालेल्या श्रीविष्णूंनी राहूचा शिरच्छेद केला. मात्र त्याने अमृतप्राशन केलेले असल्यामुळे त्याचा मृत्यू न होता मस्तक हे राहू म्हणून आणि धड हे केतू म्हणून अमर्त्य राहिले. या शिक्षेचा प्रतिशोध घेण्यासाठी राहू आणि केतू वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात याच्यामुळे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते असे मानले जाते. नवग्रह समूहामध्ये मूलतः सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे दृष्य ग्रह समाविष्ट आहेत. प्राथमिक वैदिक खगोलशास्त्र ताऱ्यांवर आधारीत होते. नवग्रह समूहात राहू आणि केतू या अदृष्य वा भासमान ग्रहांचा समावेश हे भारतीय खगोलशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. यापैकी राहू हा सूर्य वा चंद्र यांना गिळंकृत करून ग्रहण घडवतो असे समजले जाते. काही भारतीय ग्रंथांमध्ये केतू हा धूमकेतू वा उल्का स्वरुपात असल्याचा उल्लेख आढळतो आणि त्यातून प्रसारित होणारे किरण हे अपशकुन मानले जाते. नवग्रहांचा मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव असतो असे मानले जाते. अति प्राचीन अशा म्हणजे सुमारे पाचव्या शतकातील हिंदू देवालयांमध्ये राहू आणि केतू यांच्या दिव्य मूर्ती आढळतात.
संदर्भ: https://www.britannica.com/topic/navagraha
चित्र सौजन्य :- भागवतम् कथा