101

प्रश्नमंजुषा- मानस(रामचरितमानसातील) तत्वज्ञान

३१ जुलै ह्या दिवशी संत तुलसीदास यांची जयंती असते. त्यांचा जन्म ५२८ वर्षांपूर्वी झाला. गांधीजींनी एका प्रसंगी तुलसीदास यांच्या रामचरितमानस ह्या ग्रंथाचे वर्णन ‘सर्व भक्तिसाहित्यातील सर्वोत्तम पुस्तक’ असे केले होते. भाषाशास्त्रज्ञ सर जॉर्ज ग्रिफिथ यांनी तुलसीदास यांना ‘बुद्धांनंतर जनमानसावर राज्य करणारा सर्वोत्तम नेता’ ह्या शब्दांनी गौरविले आहे. रामचरितमानस म्हणजे ‘श्रीरामाचा कर्तृत्वसागर-त्याच्या कार्याचे भव्य सरोवर!’ लोक अत्यन्त आपलेपणाने व आवडीने केवळ ‘मानस’असे म्हणतात. उत्तर भारतातील अनेकांसाठी रामचरितमानस हा ग्रंथ पवित्र मानला जातो.शब्दाशब्दांत भक्ती ओसंडून वाहणाऱ्या काव्यरचनेसाठी तो अत्यन्त प्रसिद्ध आहे. त्यात हिंदू तत्त्वज्ञानाच्या गहन चिंतनाचे समर्पक व्यापक दर्शन आहे. तुलसीदासांच्या जयंतीनिमित्त, ‘तत्वचिंतक श्री तुलसी’ मानसमध्ये काय म्हणत आहेत,ते पाहू या.

संदर्भ-

श्री पवन वर्मा यांचे वाचनीय, आल्हाददायी पुस्तक
‘The greatest ode to Lord Ram: Tulsidas’s Ramcharitmanas’

५ भाग्यवान स्पर्धकांना हे पुस्तक भेट म्हणून दिले जाईल.

आणि

website https://ramcharitmanas.info/

दैनंदिन वापरातील कोणत्या वस्तूचा उपयोग तुलसी संतसज्जनांच्या ‘वैराग्य, निःस्वार्थीपणा आणि दुःख सहन करण्याची क्षमता या गुणांचे वर्णन करण्यासाठी करतात?

संत तुलसी, संत कबीरा प्रमाणेच आपल्याला, काही लोकांना जवळ ठेवण्याचा सल्ला देतात, जेणेकरून ते आपल्याला आपले दोष दाखवू शकतील. कोण बरं हे लोक?

तुलसीदासांच्या मते , निर्गुण निराकार परमेश्वर सगुण ईश्वराच्या रुपात कुणाच्या प्रभावामुळे साकार होतो?

तुलसी वेदांतातील ‘समुद्र-तरंग:न्यायाचा उपयोग ईश्वराच्या एक असण्यावर जोर देण्यासाठी करतात. या तुलनेत कोणते घटक वापरले जातात?

तुलसीना ‘रामचरितमानस’ लिहिण्याची प्रेरणा कोणत्या देवतेकडून मिळाली?

अहंकाराचे तोटे दाखवण्यासाठी तुलसी प्रसिद्ध शिव-सती कथेतील सतीच्या वडिलांचे उदाहरण वापरतात.काय आहे त्यांचं नाव?

तुलसीदासांच्या मते, प्रभूच्या रूपाचे वर्णन कोण करू शकतो?

जीवनातील चढ-उतारांमुळे एखाद्याने का अस्वस्थ होऊ नये हे स्पष्ट करण्यासाठी तुलसी जगाची तुलना कशाशी करतात?

तुलसींनुसार जन्म आणि मृत्यू, सुख आणि दुःख, हानी आणि लाभ, हे सर्व कोणत्या कायद्या/ नियमांतर्गत घडतात?

तुलसी च्या दृष्टिकोनातून ‘मी आणि माझे’ , ‘तू आणि तुझे’ ही भावना कोणती संकल्पना स्पष्ट करतात?

रामराज्यात कुणावर विजय मिळवणे अभिप्रेत होते व त्याचा उद्देश काय होता?

तुलसीदास भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याची तुलना दुष्ट लोकांशी करतात,त्या पक्ष्याचे नाव सांगा.

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In