178

वामन आणि बली प्रश्नमंजुषा

ओणम हा केरळमधील सर्वात लोकप्रिय सण आहे.
हा सर्व समाजघटकांकडून साजरा केला जातो. या सणाचे मूळ वामन अवताराशी निगडित आहे. विष्णू ज्या अवतारांमध्ये मानव किंवा अर्धमानव रूपात प्रकट होतात, त्यात वामन अवतार हा विलक्षण आहे. या अवतारात शस्त्र न वापरता धर्माची स्थापना केली गेली. हा अवतार प्राचीन असून लोकप्रिय आहे. महाभारत, महाभाष्य तसेच बौद्ध ग्रंथांतही त्याचा उल्लेख सापडतो.
या प्रश्नमंजुषेत आपण वामन आणि बली यांच्याबद्दल रंजक माहिती १२ प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
बळीराजाचा पूर्वज कोण? बळीराजा फसवला गेला होता का, की त्याने सर्व जाणत असताना देखील सर्वकाही विष्णूंना अर्पण केले? कृष्ण व बळी ह्यांचा परस्परसंबंध काय आहे?

ही प्रश्नमंजुषा वामन पुराणावर आधारित आहे.
५ भाग्यवान स्पर्धकांना बिबेक देब्रॉय लिखित भगवद्गीता पुस्तक भेट म्हणून दिले जाईल.

बली/बळीचा पूर्वज कोण आहे

वामनावताराचा सर्वात जुना संदर्भ कोणत्या ग्रंथात पहावयास मिळतो?

बळी हा असुर असूनही त्याच्या राज्यात कुणी प्रवेश केला?

ऋषी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामनाचा जन्म झाला. त्यांच्या पोटी आणखी कोण जन्माला आले?

बळीच्या गुरूने त्याला विष्णूला काहीही अर्पण करू नये असा सल्ला दिला.हा बळीचा गुरु कोण?

जेव्हा बळीराजाने वामनाला विचारले की तो वामनाला काय देऊ शकतो तेव्हा ह्या विचारण्यामागे त्याचा काय भाव होता?

वामन जे महाकाय पावले टाकतो आणि रुप धारण करतो त्याला काय नाव देण्यात आलं आहे?

जेव्हा वामन तिसरे पाऊल उचलण्यास सिद्ध होतो तेव्हा बळीचा मुलगा बाण वामनाशी काय बोलला?

विष्णू तीन पावले मोजल्यानन्तर बळीराजाला काय देतात?

वामन अवतारात कुरुक्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. तिथे कोणती घटना घडली?

भारतातील एका प्रमुख सणानंतर लगेच बलीची पूजा केली जाते. हा प्रमुख सण कोणता?

बौद्ध परंपरेतही बलीची कहाणी सांगितली आहे आणि तो एक ज्ञानी माणूस होईल असा उल्लेख आहे. त्यात बाली कसे दाखवले आहे?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In