बिगर मुसलमानांचे स्थान असलेला चीनमधील प्रदेश तुर्कस्तान
पूर्व तुर्केस्तान ज्याला आता शिन्-ज्यांग असे म्हणतात, त्या प्रदेशातील कुचर नावाच्या गावी बॉवर हस्तलिखित १८९० साली सापडले. हा प्रदेश सध्या चीनमध्ये असून बिगर मुसलमानांचा प्रदेश आहे आणि तेथे अशांतता असते. श्री. बॉवर यांनी हे हस्तलिखित १८९० साली कोणाकडून तरी विकत घेतले. त्यात एकूण पाच खंड आहेत आणि त्यातील पहिल्या खंडात प्राचीन भारतातील वैद्यकीय ज्ञानाचे संकलन केलेले आहे.
या पहिल्या खंडाचे तीन भाग आहेत. दुसऱ्या भागाला नवनितक असे नाव आहे. या भागात अनेक औषधांच्या निर्मितीचे वर्णन (कृती आणि घटकांसहित) आहे. यामध्ये प्राणीजन्य( मध, दूध इ.), खनिजे(मीठ, सोने, शिसे इ.) आणि वनस्पतीजन्य(हळद, कोरफड इ.) पदार्थांपासून बनविलेल्या औषधांचे रोगांवरील उपयोग सांगितलेले आहेत. यामध्ये चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता यांचा संदर्भ अनेक वेळा दिला आहे.
या हस्तलिखिताचा काळ साधारण इसवी सनाचे तिसरे शतक आहे आणि हे हस्तलिखित आधीच्या कुठल्यातरी हस्तलिखितावरून उतरवून काढलेले आहे. त्यावरून इतिहासकारांनी असा निष्कर्ष काढला की चरक आणि सुश्रुत यांचे ग्रंथ हे यापेक्षाही खूपच आधी निर्मिलेले असावेत.
स्त्रोत : पी कुटुंबैया यांचे “Ancient Indian Medicine” हे पुस्तक