योग या शब्दाची व्युत्पत्ती युज् (अर्थ : एकत्र जोडणे) या संस्कृत धातुपासून झाली आहे. योग ही मुख्यत्वे शरीर आणि मन यांच्यामधे समन्वय साधणारी एक आध्यात्मिक शिस्तबद्धता आहे. पातांजली मुनींनी आपली योगविषयक शिकवण एका संक्षिप्त स्वरूपात संकलित केली आहेत. त्यांनी लिहिलेली योगसूत्रे ही मोठ्या प्रमाणावर योगसंबंधात प्रमाणसंदर्भ मानली जातात.
स्वतःवर नियंत्रण मिळवण्याची शिस्तबद्ध सवय म्हणजेच राजयोग असे पातांजली मुनींनी वर्णन केले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी त्याची अष्ट अंगे आहेत.
योगसूत्र २.४६ सांगते की “स्थिरम् सुखम् आसनम्”. योग ध्यानधारणा करण्यासाठी आपली स्थिती स्थिर, संयत आणि सुखकर असली पाहिजे. सोबतचे चित्र (सारा वेल्क यांची wikipedia वरील प्रतिमा असून) हे हंपी येथील १६व्या शतकातील अच्युतराय मंदिरात असलेले एक आसनमुद्रेचे आहे. त्या मंदिरात इतरही अनेक आसनमुद्रा आहेत.
माहितीस्रोत : राहुलदेव मंडल यांचे ‘अष्टांगयोग’ रविंद्र भारती विद्यापीठ